नाहीर अख्ख्या कंपनीची तोडफोड करून जाईन, कंपनीच्या नोकर भरतीमध्ये मराठी भाषेला डावलल्याने मनसे आक्रमक
नवी मुंबईतील एका कंपनीच्या नोकर भरतीमध्ये मराठी भाषेला डावलल्याने मनसे आक्रमक झाली आहे. कंपनीने हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषा सक्तीची जाहिरात दिल्यानंतर, मराठीला दुय्यम स्थान दिल्याबद्दल माफी मागितली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी लेखी माफीची मागणी करत, अन्यथा कंपनीची तोडफोड करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या नोकर भरतीमध्ये मराठी भाषेला डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीने हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषा सक्तीची असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यामुळे मराठीला दुय्यम स्थान मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेच्या पवित्र्यानंतर कंपनीने अखेर आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. मात्र, मनसे नेते गजानन काळे यांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान देणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला आहे.
Published on: Oct 31, 2025 03:49 PM
