Nawab Malik | किरण गोसावीची कथित ऑडिओ क्लिप नवाब मलिकांकडून ट्विट
नवाब मलिक यांनी यापूर्वी या प्रकरणातील काही व्हॉट्सअप चॅट उघड केले होते. त्यानंतर आता मलिक यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के. पी. गोसावीच्या काही ऑडिओ क्लिप्स जाहीर केल्या आहेत. यात गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करत आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी या प्रकरणातील काही व्हॉट्सअप चॅट उघड केले होते. त्यानंतर आता मलिक यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के. पी. गोसावीच्या काही ऑडिओ क्लिप्स जाहीर केल्या आहेत. यात गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करत आहे
