Nawab Malik यांना समन्स न देता ED अधिकारी घेऊन गेले : Nilofer Khan

Nawab Malik यांना समन्स न देता ED अधिकारी घेऊन गेले : Nilofer Khan

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 8:02 PM

नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली आणि त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबईः महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी अटकेवरून महाराष्ट्रातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीतले सारेच पक्ष भाजपवर तुटून पडतायत. तर भाजपकडून अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. याचे पुढे काय होईल, ते येणारा काळच ठरवेल. मात्र, नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी काल सकाळी कधी पोहचले, त्यांनी कशी चौकशी केली आणि त्यांची अटकेची पद्धत कशी होती, याबद्दल प्रथमच मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी माध्यमांशी संवाद साधला.