Ajit Pawar : ‘तो’ शब्द चुकीचा, त्याबद्दल दिलगिरी…शिवराळ भाषेनंतर अजितदादांची जाहीरपणे माफी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अकोला येथील प्रचार सभेत आपला शब्द मागे घेतल्याचे पाहायला मिळाले. अंबाजोगाई येथील सभेत अजित पवारांनी विकासाच्या गप्पा मारणारे अनेक नेते असतात, पण त्यांची स्वतःची शहरेच भकास असतात असं वक्तव्य केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अकोला येथील प्रचार सभेत, एका विशिष्ट शब्दाच्या वापराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. शहरांतील बकालपणावर भाष्य करताना त्यांनी भिकार या शब्दाचा उपयोग केला होता, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारख्या शहरांचा विकास केल्याचे सांगत, इतर शहरांमध्येही बकालपणा नसावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अजित पवारांनी अंबाजोगाई येथील सभेत स्वतःच्या कार्यशैलीचे समर्थन करताना महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले, “मी थातुरमातुर सांगत नाही, शब्दाचा पक्का आहे.” बारामतीसारख्या स्वतःच्या मतदारसंघातील विकासाचा दाखला देत, त्यांनी इतर नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. विकासाच्या गप्पा मारणारे अनेक नेते असतात, पण त्यांची स्वतःची शहरेच भकास आणि बकाल असतात, असे निरीक्षण पवारांनी नोंदवले. यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.