Ajit Pawar : माळेगाव साखर कारखाना निवडणूक.. स्वतःच्या नावाची दादांकडून चेअरपदाची घोषणा; माझ्याएवढा उजवा मिळला तर…

Ajit Pawar : माळेगाव साखर कारखाना निवडणूक.. स्वतःच्या नावाची दादांकडून चेअरपदाची घोषणा; माझ्याएवढा उजवा मिळला तर…

| Updated on: Jun 15, 2025 | 9:29 AM

एखाद्याला निवडून आणायचे की नाही, हे ठरवले तर मी काय करू शकतो हे राज्यासह पुरंदर आणि शिरूरला माहीत आहे. विरोधकांकडून आम्ही सहकार मोडीत काढायला निघालो असल्याची टीका केली जाते. मात्र, विरोधकांचा हा आरोप खोटा आहे, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतःउमेदवार आहे. अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’च्या प्रचाराला शनिवारी सुरुवात केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

तर दुसरीकडे शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा नारळ फोडलाय. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बळीराजा हे पॅनल असून ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना अजित पवार म्हणाले, ‘माळेगावचं भलं करायचं असेल तर अजित पवारच पाहिजे. कारखानदारी अडचणीत आहे. ज्याच्यात धमक आहे.त्याच्या हातात ही कारखानदारी द्यायची.’, असं दादा म्हणाले. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या तुम्ही दोघांना संधी दिली आता आम्हाला संधी द्या… त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Published on: Jun 15, 2025 09:29 AM