Ajit Pawar : सॉरी… चुकलं माझं… समजून घ्या… अजितदादा भर सभेत विसरले! दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा चुकले अन्…

| Updated on: Nov 28, 2025 | 3:38 PM

मंचर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चा रंगली. त्यांनी सुरुवातीला प्रत्येकाला तीन मते देण्याचा अधिकार असल्याचे म्हटले, नंतर तीन बटणे दाबण्याचा अधिकार असे सुधारले. आपल्या चुकीची कबुली देत, त्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. सुरुवातीला त्यांनी, “तुम्हाला प्रत्येकाला तीन मते देण्याचा अधिकार आहे,” असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी त्वरित दुरुस्ती करत, “तीन बटणे दाबण्याचा अधिकार आहे,” असे सांगितले. आपल्या चुकीची त्यांना जाणीव होताच, त्यांनी उपस्थितांची माफी मागितली.

नंतर अजित पवार म्हणाले, “मी काल ज्या भागात होतो तिथे तीन होते, नगर पंचायतीला एकच आहे, बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला दोन आहेत. समजून घ्या, समजून घ्या. सगळ्या महाराष्ट्रात फिरताना कुठं दोन आहेत, कुठं एक आहे, आपली माघार. तीन नाही, दोन. मी नेहमी सांगतो, माझं चुकलं की लगेच माघार घेतो. पण चुकलं ते माझ्या मनाला पटले पाहिजे चुकलंय म्हणून. हे पटले, माघार.” त्यांच्या या स्पष्टीकरणातून मताधिकार किंवा बटणे दाबण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो, हे त्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Published on: Nov 28, 2025 03:38 PM