Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत दाखल

| Updated on: Jan 31, 2026 | 9:55 AM

बारामतीहून सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार मुंबईत दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, त्यांनी ही माहिती शरद पवार किंवा अन्य कुटुंबीयांना दिली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

बारामतीहून मुंबईत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह मुंबईत पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बारामतीहून मुंबईकडे येताना शरद पवार किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना याची कल्पना दिली नव्हती.

अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधनानंतर तीन दिवसांतच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होतील अशी चर्चा आहे. आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार असून, त्यात सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता लोकभवनावर त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 31, 2026 09:55 AM