बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर… अजित दादांची फटकेबाजी

बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर… अजित दादांची फटकेबाजी

| Updated on: Apr 24, 2024 | 5:11 PM

संरक्षण मंत्र्याचा विचाराचा खासदार ज्यावेळेस जाईल तेव्हा मिळेल म्हणून आम्ही म्हणतोय घड्याळाला मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांनी त्यांना सोडलं आम्हाला सोडून गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.

अजित पवार हे काल रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत होते. या गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. हे बंधन आणि तोडगा काढायचा आहे. हे केव्हा निघेल संरक्षण मंत्र्याचा विचाराचा खासदार ज्यावेळेस जाईल तेव्हा मिळेल म्हणून आम्ही म्हणतोय घड्याळाला मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांनी त्यांना सोडलं आम्हाला सोडून गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. अजित पवार पुढे असेही म्हणाले की, माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए जिल्हा परिषद, राज्य सरकार निधी आहे, माझी पणं जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली, हे काम करुन दे तर मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझ काही खरं नाही, असे म्हणत त्यांनी मिश्कील भाष्य केले.

Published on: Apr 24, 2024 05:11 PM