Manikrao Kokate : बोलताना भान… कोकाटे अजित पवारांच्या भेटीला, दादांनी टोचले कान अन्… मंत्रिपद जाणार?

Manikrao Kokate : बोलताना भान… कोकाटे अजित पवारांच्या भेटीला, दादांनी टोचले कान अन्… मंत्रिपद जाणार?

| Updated on: Jul 29, 2025 | 11:47 AM

मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांनी कोकाटेंवर उघड नाराजी व्यक्त केली. करण्यात आली. कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचे म्हणत अजित पवारांनी कोकाटेंना चांगलंच फटकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. माणिकराव कोकाटे हे मुंबईतील मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. कोकाटे अजित पवारांच्या दालनात दाखल झाल्यानंतर या दोघांमध्ये साधारण १५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा सुरू होती. यावेळी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त करत बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत त्यांची कानउघडणी केली.

दरम्यान, अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ कोकाटेंचा समोर आला होता. यासोबतच सरकार भिकारी असल्याचं वक्तव्यही कोकाटेंनी केलं होतं. यावरूनच गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात माणिकराव कोकाटे सापडले असून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यामुळे सरकारची एकच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या घडामोडीदरम्यान माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दादांनी कोकाटेंचे कान टोचले असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे या भेटीनंतर कोकोटेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

Published on: Jul 29, 2025 11:47 AM