Manikrao Kokate : कृषी खातं हातून गेलं तरीही कोकाटे म्हणताय I Am Very Happy… खातं बदल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
मंत्री कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचे खाते बदलले असून त्यांचं कृषी खाते काढू घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते. मात्र त्यांना समज दिल्यानंतर कोकाटेंचं मंत्री पद वाचलंय. मात्र त्याच्या खात्यात बदल करण्यात आलाय. कोकाटे यांच्याकडे कृषी खातं हेतं. परंतु हे कृषी खातं दादांचेच मंत्री दत्ता मामा भरणे यांना देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडील क्रिडा आणि युवक कल्याण खाते कोकाटेंना देण्यात आलं. दरम्यान, कृषी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांना नाराज आहात का? असा सवाल केला. यावर कोकाटे स्पष्टपणे म्हणाले, मी अजिबात नाराज नाही.. I am very happy असं म्हणत मी आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी कोकाटे असंही म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे. तर कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेल्यानंतर कोकाटे म्हणाले, भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. अत्यंत मोठा आणि जानकार शेतकरी आहे. त्यांच्याकडे कृषी खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चित न्याय होईल. दत्तामामा भरणे यांना काही मदत लागली तर मी मदत करणार. इतकंच नाहीतर मला काही मदत लागली तर त्यांचा सल्ला घेणार.
