मुंडे बंधूभगिनींचा पत्ता कट अन् बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणांमुळे पालकमंत्रीपद हातून निसटलं?

| Updated on: Jan 20, 2025 | 10:48 AM

बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आली असून मुंडे बंधूभगिनींचा पत्ता कट झाला आहे. धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आलं नाहीये. दरम्यान कोणत्या कारणामुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला?

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय. बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजितदादांकडे देण्यात आली असून धनंजय मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलाय. धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं नाहीये. दरम्यान धनंजय मुंडेंना सोडून दादांकडे बीडचं पालकमंत्री पद का देण्यात आलं यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बीड हत्या प्रकरणावरून विरोधक आणि सुरेश धसांनी केलेल्या आरोपांचा धनंजय मुंडेंना फटका बसल्याची ही चर्चा आहे. धनंजय मुंडेबाबतचा निर्णय पक्षाने विचारपूर्वक घेतल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. भविष्यात त्यांच्यावर योग्य जबाबदारी टाकण्यात येईल असेही भाष्य यावेळी तटकरेंनी केलं आहे. दरम्यान, २०१९ ते २४ या कार्यकाळात दोन वेळा धनंजय मुंडेंकडे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दादांकडे बीडची जबाबदारी धनंजय मुंडेंचा पत्ता कट. २०१९ मध्ये पहिल्यांदाच धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आले. दरम्यान मविआ सरकारच्या काळात त्यांच्यावर बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान तेव्हाही महायुती सरकारच्या काळात बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी धनंजय मुंडेंकडेच देण्यात आली होती.

Published on: Jan 20, 2025 10:48 AM