Jitendra Awhad Video : ‘… तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू’, ‘लाडकी बहीण’वरून आव्हाड संतापले, थेट महायुतीला इशारा

Jitendra Awhad Video : ‘… तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू’, ‘लाडकी बहीण’वरून आव्हाड संतापले, थेट महायुतीला इशारा

| Updated on: Feb 17, 2025 | 12:57 PM

'खोटी आश्वासन देऊन आता पळ कशाला काढता', असं म्हणत जितेंद्र आव्हाड सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले. जर माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावं कमी केली तर महिलांना घेऊन मंत्रालयात खुसू, असा थेट इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘खोटी आश्वासन देऊन आता पळ कशाला काढता’, असं म्हणत जितेंद्र आव्हाड सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले. जर माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावं कमी केली तर महिलांना घेऊन मंत्रालयात खुसू, असा थेट इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे. ‘सुप्रीम कोर्टाने सांगितले की, या योजनेद्वारे महिलांना देण्यात येणारा पैसा म्हणजे तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करताय.. जर लाडकी बहीण योजनेतून नाव कापली जाणार असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होईल’, असं जितेंद्र आव्हाज म्हणाले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा जाहीर करून महिलांना पैसे देऊन मतांसाठी लाच दिली. मतं मिळाली सरकार आलं, सत्ता आली त्यानंतर आता लाभार्थी महिलांना घरी पाठवा…पण आम्ही त्याच महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू.. कॅबिनमध्ये महिलांना बसवू, मंत्र्यांचं जगणं मुश्कील करून टाकू, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधीर नेत्यांना दिला.

महिलांनो… ‘लाडकी बहीण’बाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ लाभार्थीना योजनेतून वगळणार

Published on: Feb 17, 2025 12:48 PM