Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ

| Updated on: Jul 20, 2025 | 11:56 AM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आज एक ट्वीट करत मोठी खळबळ उडवून दिली. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर राज्याच्या कृषीमंत्र्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बघा काय आहे तो व्हिडीओ?

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चक्क रमी खेळत असल्याचे पाहायला मिळाले. तसे काही व्हिडीओ सध्या समोर आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमीचा डाव सभागृहात मांडला. कृषी मंत्र्यांच्या या बेजबाबदार वर्तनावरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत एक ट्वीट केले आहे. यासोबत रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओही ट्वीट केलाय. यामध्ये त्यांनी कोकोटे रमी खेळत असल्याचा दावा केलाय. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी कोकोटे यांना लक्ष्य केलंय. ‘सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?’, असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

Published on: Jul 20, 2025 11:49 AM