Rohit Pawar : धडधडीत खोटं, रमीची जाहिरात स्किप करायला 42 सेकंद? स्वतःला वाचवण्यासाठी… रोहित पवारांकडून 2 नवे VIDEO ट्वीट
'विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे', रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आणखी दोन व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं आहे. माणिकराव कोकाटेंनी त्या व्हिडीओवरून दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. इतकंच नाहीतर जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात का? असा सवालही रोहित पवार यांनी आणखी दोन नवे व्हिडीओ शेअर करताना केला आहे. ‘सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… ‘, असं रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटलंय. इतकंच नाहीतर पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. असं म्हणत रोहित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.
