‘तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी…’, संतोष देशमुख अन् महादेव मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे भडकल्या

‘तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी…’, संतोष देशमुख अन् महादेव मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे भडकल्या

| Updated on: Feb 19, 2025 | 12:43 PM

सुप्रिया सुळेंनी सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात दीड वर्ष होऊनही मारेकरी सापडलेले नाहीत. तर देशमुख हत्या प्रकरणातला सातवा आरोपी कृष्णा आंधळे ही फरार आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.

सुप्रिया सुळेंनी एकाच दिवशी सरपंच संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुखांची आई आणि महादेव मुंडे यांच्या पत्नीला सुप्रिया सुळेंनी न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. तर सुप्रिया सुळे समोर देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत्तर दिवस उलटले तरी आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. वाल्मिक कराड अँड गँगचा आंधळे मुख्य सदस्य पण अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. प्रायव्हेट जेटने निघालेला तानाजी सावंत यांचा पोरागा सापडतो पण देशमुखांचे खुनी का सापडत नाहीत असा संतप्त प्रश्न सुळेंनी केलाय. पवन चक्कीच्या अवदा कंपनीकडून दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात सरपंच संतोष देशमुख आडवा आला म्हणून देशमुखांची हत्या झाली. हत्येचा आरोप आका म्हणजेच वाल्मिक कराड अँड गँगवर आहे. तर खंडणीचा धंदा करणाऱ्या वाल्मिक कराडच्या मागे ईडी कशी लागली नाही असा सवालही सुळेंनी केलाय. वाल्मिक कराड सध्या बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये आहे पण जेलमध्येही कराडला सेवा सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. गावातली मुलं किरकोळ गुन्हे करून जेलमध्ये जाऊन कराडच्या बॅरेकमध्ये सेवा करत असल्याचा दावा आव्हाडांचा आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 19, 2025 12:43 PM