दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट, सुप्रिया सुळे अन् पावारंचा व्हिडीओ व्हायरल

दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट, सुप्रिया सुळे अन् पावारंचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 21, 2025 | 5:34 PM

सध्या सोशल मीडियावर पवार कुटुंबातील बाप-लेकीच्या जिव्हाळ्याचं दर्शन होणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथील दौऱा आटोपून सुप्रिया सुळे पुरंदरकडे जाताना त्यांना आपल्या आई-वडिलांची गाडी दिसताच त्या उतरल्या आणि भेट घेतली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये बाप-लेकीची भेट भर उन्हात रस्त्यातच झाल्याचे दिसतंय.

इंदापूर येथील दौरा अटपून पुरंदरच्या दिशेने जात असताना सुप्रिया सुळे यांनी रस्त्यातच शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हे बारामतीला जात होते. त्याच वेळेला शरद पवार यांची गाडी पाहिली. ही गाडी दिसताच सुप्रिया सुळे आपल्या गाडीतून उतरून शरद पवार आणि प्रतिभाताई पवार बसलेल्या गाडीच्या दिशेने गेल्यात. यानंतर सुप्रिया सुळेंनी दोघांची भेट घेतली. शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही सध्या दौऱ्यावर आहेत. हे दौरे सुरू असताना मोरगाव येथे रस्त्यातच पवार कुटुंबातील बाप-लेकीची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये काही क्षण काहीतरी संवाद झाला. दरम्यान, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या या भेटीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Published on: Apr 21, 2025 05:34 PM