Nawab Malik | ईडीने जर सोमय्यांना त्यांचा प्रवक्ता बनवला असेल तर तसं अधिकृतरित्या जाहीर करावं

Nawab Malik | ईडीने जर सोमय्यांना त्यांचा प्रवक्ता बनवला असेल तर तसं अधिकृतरित्या जाहीर करावं

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 6:31 PM

सोमय्य्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल, तर जाहीर करावं, असे खुलं आवाहनही त्यांनी केले. नवाब मलिकांनी काल ट्वीट केल्यापासून पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

मुंबईः अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत सव्याज परफेड केली. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. सोमय्य्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल, तर जाहीर करावं, असे खुलं आवाहनही त्यांनी केले. नवाब मलिकांनी काल ट्वीट केल्यापासून पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मलिकांना घेरले.