राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Sharad Pawar कोरोनामुक्त

| Updated on: Jan 31, 2022 | 7:12 PM

मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

Follow us on

YouTube video player

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP president) शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. मात्र पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सुद्धा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.