PM Modi Mandir | औंधमधील मोदींचं मंदिर हटवलं, राष्ट्रवादीचं उपरोधिक आंदोलन

PM Modi Mandir | औंधमधील मोदींचं मंदिर हटवलं, राष्ट्रवादीचं उपरोधिक आंदोलन

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 3:41 PM

15 ऑगस्टला  भाजपचे औंधमधील मयूर भांडे या  कार्यकर्त्यांने मोदींचे मंदिर तयार केले होते. सोशल मीडियात या मंदिराची जोरदार चर्चा होती, मात्र काल रात्री मोदींचे मंदिर हटवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं होतं.

पुण्यातील औंधमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज मंदिराच्या जागेवर उपरोधिक आंदोलन केले. पेट्रोल, डिझेल आणि मसाल्याचा नैवद्य दाखवत राष्ट्रवादीने आंदोलन केले. 15 ऑगस्टला  भाजपचे औंधमधील मयूर भांडे या  कार्यकर्त्यांने मोदींचे मंदिर तयार केले होते. सोशल मीडियात या मंदिराची जोरदार चर्चा होती, मात्र काल रात्री मोदींचे मंदिर हटवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यात नरेंद्र मोदी यांचं मंदिर झाल्यानं पुण्याचे प्रश्न सुटतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, देव चोरीला गेलेला असल्यानं निराश झालेली मंडळी इथं आली होती. पेट्रोल आणि डिझेलचा नैवैद्य  देवाला दाखवणार होतो. मात्र, हा नवैद्य इथंच ठेऊन जाणार आहोत, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला.