Sharad Pawar : कोणत्या पक्षासोबत युती? आघाडी संदर्भातील प्रश्नावर पवारांनी थेट म्हटलं…भाजपचा उल्लेख करत मोठं वक्तव्य

Sharad Pawar : कोणत्या पक्षासोबत युती? आघाडी संदर्भातील प्रश्नावर पवारांनी थेट म्हटलं…भाजपचा उल्लेख करत मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 17, 2025 | 2:08 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला बाजूला ठेवून इतर पक्षांशी युती करणे योग्य ठरेल, असे मत शरद पवार यांनी मांडले. ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व एकत्र येऊन निर्णय घेईल.

आगामी स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये होणाऱ्या युती संदर्भात शरद पवार यांनी मोठं आणि सूचक वक्तव्य केले आहे.  भाजपला वगळून इतर पक्षांशी युती करणे योग्य ठरेल, असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेतृत्व एकत्र येऊन निर्णय घेईल, असे शरद पवार म्हणाले. यासह शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल बोलताना, “मला जी काँग्रेस समजते, ती काँग्रेस संपणारी नाही”, असे ठामपणे सांगितले. काँग्रेस हा गांधी-नेहरूंचा विचार स्वीकारणारा पक्ष असल्याने तो पुन्हा एकदा नव्या स्थितीत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Nov 17, 2025 02:08 PM