Sharad Pawar जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 5 तारखेला जाहीर सभा अन् पक्षाकडून जय्यत तयारी

Sharad Pawar जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 5 तारखेला जाहीर सभा अन् पक्षाकडून जय्यत तयारी

| Updated on: Aug 31, 2023 | 10:25 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 5 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जळगाव मधील सागर पार्क मैदानावर होणार भव्य जाहीर सभा, पक्षाकडून जय्यत तयारी सुरू

जळगाव, ३१ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 5 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव आतील सागर पार्क मैदानावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या शरद पवार यांच्या जाहीर सभेच्या तयारीची आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची जळगावातील सागर पार्क मैदानावर भव्य अशी जाहीर सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज सागर पार्क मैदानावर शरद पवार यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी उभारण्यात येत असलेल्या सभामंडपासह तयारीची पाहणी केली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली. तसेच तयारीबाबत आवश्यकता सूचनाही यावे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

Published on: Aug 31, 2023 10:25 PM