मलिकांच्या अटकेविरोधात मुश्रीफांच्या नेतृत्वात आंदोलन
आज राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात मलिक यांच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई : महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या या कारवाईचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात कालपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात मलिक यांच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
