Neelam Gorhe : कोण कुठल्या भाषेत बोलतं, यापेक्षाही जनादेश महत्त्वाचा; नीलम गोऱ्हेंचा आशिष शेलारांना टोला

| Updated on: Sep 04, 2022 | 3:17 PM

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  यांच्यावर टीका करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखते. अशा बऱ्याच गोष्टी ते बोलत असतात. पण ते काय बोलतात हे त्यांच्या तरी लक्षात असतं का, असा सवाल करत अशा बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं.

Follow us on
पुणे : काही लोक फक्त धुरळा उडवण्याचे काम करत आहेत. पण लोकांच्या डोळ्यात धुराळा कधीच जाणार नाही. कोण कुठल्या भाषेत बोलत आहे, यापेक्षाही जनादेश महत्त्वाचा आहे. त्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल (Shivsena) किती प्रेम आहे हे येणाऱ्या काळात कळेल, असे वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले आहे. नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आले होते, त्यावेळी त्यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. देव जसं ठरवतात की दर्शन कसं द्यायचं त्या प्रमाणात दर्शन होत असतं. आम्ही दर्शन घेतलेला आहे म्हणण्यापेक्षा बाप्पांनी आम्हाला दर्शन दिले आहे. गणेश भक्तांचे आणि सामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनापासून सगळ्यांची सेवा करण्याचा आशीर्वाद देवाने त्यांना दिला, असे त्या म्हणाल्या. तर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, की मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखते. अशा बऱ्याच गोष्टी ते बोलत असतात. पण ते काय बोलतात हे त्यांच्या तरी लक्षात असतं का, असा सवाल करत अशा बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं, असा टोला त्यांनी लगावला.