काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 29, 2024 | 1:34 PM

आयकर विभागाने काँग्रेसला १७०० कोटी रूपये रक्कमेचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही काँग्रेसची खाती गोठवण्याचा आयकर विभागाने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस देण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

Follow us on

काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस बजावण्यात आली आहे. २०१७-२०१८ आणि २०२०-२०२१ या कालावधीतील दंडासह व्याजासंदर्भात ही नोटीस काँग्रेस पक्षाला बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने काँग्रेसला १७०० कोटी रूपये रक्कमेचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही काँग्रेसची खाती गोठवण्याचा आयकर विभागाने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस देण्यात आली आहे. गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आयकर विभागाविरूद्ध काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आयकर विभागाच्या नोटीसमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसचे वकील आणि राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, आयकरच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली यावेळी आयकरची कारवाई अनावश्यक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले.