Fast News | … म्हणून निवडणूका नाही; आदित्य ठाकरेंचा भाजप आणि शिंदे सरकारवर गंभीर आरोप
ज्या माणसाला आपले खाते आवडत नाही, अशांना मंत्रिमंडळात ठेवणं गैर असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरून व्यक्त केलं
मुंबई : सर्व सर्व्हे विरोधात जात असल्यामुळे निवडणुका घेतल्या नाहीत असा आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला. यावेळी सर्व्हे हे विरोधात जात असल्यानेच अजून मुंबईसह कोणत्याही निवडणूका झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे आम्हाला परत घेतील का? आम्हाला गद्दार तरी बोलू नका असे गप्पांमधून विरोधक बोलत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या माणसाला आपले खाते आवडत नाही, अशांना मंत्रिमंडळात ठेवणं गैर असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरून व्यक्त केलं. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दादा भुसे यांच्यासोबत बैठक सुरू. दिंडोशीतून आज लॉंग मार्चला झाली सुरूवात. दुपारी रस्त्यावर कांदा फेकत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
Published on: Mar 13, 2023 09:16 AM
