Monsoon Update | पुढचे 5 दिवस पुण्यात मान्सूनच्या जोरदार सरी, हवामान शास्रज्ञांचा अंदाज

| Updated on: Jun 10, 2021 | 2:00 PM

पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून वार्‍यांना पुन्हा चालना मिळणार आहे.

Follow us on

नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा (मान्सून) यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र ,मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच त्याचा वेग मंदावला होता. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला असून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे. पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून वार्‍यांना पुन्हा चालना मिळणार आहे.