तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर संजय राऊतला लांब ठेवा; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर संजय राऊतला लांब ठेवा; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

| Edited By: | Updated on: Apr 30, 2023 | 12:16 PM

Nitesh Rane on Sanjay Raut : नितेश राणे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा अन् उद्धव ठाकरेंना सल्ला; पाहा व्हीडिओ...

सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तर उद्धव ठाकरेंना सल्ला दिलाय. “आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात संजय राऊतने वाद लावले आहेत. उद्धवजींना सांगेन,तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर याला लांब ठेवा”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. 1998 ला याने अस म्हंटल होतं की जर मला खासदारकीची उमेदवारी दिली नाही तर या बाप लेकांना मी पोचवतो. हा घरात घेण्याच्या लायकीचा नाही. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतला घरात घेऊ नये, असं नितेश राणे म्हणाले आहेत. संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे, असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे.कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचे बाप काढायचे, भांडणं लावायची, भावा भावात वाद लावायचे हे पहिल्यापासून याचे धंदे आहेत, असा घणाघातही राणेंनी केला आहे.

Published on: Apr 30, 2023 12:16 PM