संजय राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा

संजय राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा

| Updated on: Dec 03, 2023 | 3:25 PM

मध्यप्रदेश कित्येक वर्ष भाजपची सत्ता आहे तर राजस्थानातही भाजप आघाडीवर आहे. याचा निकाल जनतेने दिला असेल तर अशा चिल्लर लोकांना कोण विचारतंय, असं म्हणत नितेश राणे यांचा संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : देशातून भाजपची लाट ओसरत चालली असून काँग्रेस एक सक्षम पक्ष म्हणून उभारी घेईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देशातून भाजपची लाट ओसरत चालली आहे की नाही, याचे उत्तर जनतेने दिलं आहे. मध्यप्रदेश कित्येक वर्ष भाजपची सत्ता आहे तर राजस्थानातही भाजप आघाडीवर आहे. याचा निकाल जनतेने दिला असेल तर अशा चिल्लर लोकांना कोण विचारतंय, असं म्हणत नितेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर ज्या पद्धतीने संजय राऊत यांच्यावर कारवाया सुरू आहेत. त्यामुळे आता किती दिवस बाहेर राहतील? असा सवाल करत मोदी तिसऱ्यांदा शपथविधी घेतील, तेव्हा जेलमधून संजय राऊत तो बघणार, असे म्हणत सडकून टीकाही राणे यांनी केली आहे.

Published on: Dec 03, 2023 03:25 PM