राऊतांनी दाखल केलेल्या खटल्याचे न्यायाधीश बदला; नितेश राणेंची मागणी
संजय राऊत यांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको, असं नितेश राणे यांनी मागणी केली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
संजय राऊत यांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको, असं नितेश राणे यांनी मागणी केली आहे. नितेश राणे यांच्या वकिलाने ही मागणी न्यायालयाकडे केली आहे. राऊत मानहानीप्रकरणी सध्या न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावरून राऊतांनी दाखल केलेला खटला हा सध्याच्या न्यायाधीशांसमोर नको अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपहार्य विधान केल्या प्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधात मानहानीचा खटला माजगाव न्यायालयात दाखल केला आहे. याच प्रकरणी नितेश राणे कोर्टात हजर न झाल्याने एनबी डब्ल्यु वॉरंट जारी झालेलं होतं आणि ते रद्द करता राणे यांनी हजर असावं अशी अट घालण्यात आली होती. त्यानुसार आज राणे माजगाव कोर्टात हजर झाले. मात्र, यावेळी त्यांच्या वकिलांनी हा खटला सध्याच्या न्यायाधीशांसमोर नको, तो दुसरीकडे दाखल करावा अशी मागणी केलेली आहे.
