Nitesh Rane : सर्वांचा हिशेब इथेच होणार, तो क्षण जवळ आलेला आहे; ‘त्या’ आठवणीने नितेश राणे भावुक
Nitesh Rane On Narayan Rane's Arrest : मंत्री नितेश राणे यांनी वडील नारायण राणे यांच्या अटकेचा तो क्षण पुन्हा आठवण करून देत सर्वांचा हिशेब इथेच होणार आहे असं म्हंटलं आहे.
नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार, असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी वडील नारायण राणे यांच्या अटकेचा तो क्षण पुन्हा आठवण करून दिला. नारायण राणे यांच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात नितेश राणे बोलत होते. कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला कुणीही सुटणार नाहीत, असंही यावेळी आपल्या भाषणातून नितेश राणे यांनी म्हंटलं.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली आहे. जेवण करत असताना देखील अटक करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाग पाडलं होतं, याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी करुन दिली.
