FasTag : तुमच्या कारला फास्टटॅग आहे? तर तुमच्यासाठी एक Good News, कारण आता वर्षभरासाठी…
FASTag Annual Pass: नितीन गडकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "एका ऐतिहासिक उपक्रमात, १५ ऑगस्ट २०२५ पासून ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जात आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल."
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाची आहे. त्यातच तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर टोलची भानगड आता मिटणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तीन हजार रूपयांमध्ये एका वर्षासाठी FasTag चा पास काढता येणार आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू होणार असून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहन चालकांना याचा लाभ होणार आहे.
नितीन गडकरी यांनी आज सोशल मीडियाद्वारे देशभरात वर्षभरासाठी फास्टॅग पास जारी करण्याची घोषणा केली आहे. या वार्षिक पाससाठी वापरकर्त्यांना वर्षातून फक्त एकदाच ३,००० रुपये खर्च करावे लागतील. त्यानंतर हा पास त्यांना दिला जाईल. तर ३ हजार रूपयांनी काढलेल्या वर्षभराच्या पासमध्ये एका वर्षात २०० ट्रीप वाहन चालकांना मारता येणार आहे. जर या २०० ट्रीप वर्षभराच्या आत झाल्या तर वाहन चालकांना हा पास रिन्यू करता येणार आहे.
बघा काय म्हणाले गडकरी…
महत्वपूर्ण घोषणा। 📢
एक ऐतिहासिक पहल के तहत, 15 अगस्त 2025 से ₹3,000 की कीमत वाला FASTag आधारित वार्षिक पास शुरू किया जा है। यह पास सक्रिय होने की तिथि से एक वर्ष तक या 200 यात्राओं तक, जो भी पहले हो, वैध रहेगा।
यह पास केवल गैर-व्यावसायिक निजी वाहनों (कार, जीप, वैन आदि) के लिए…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2025
