Rohit Arya : पायावर गोळी मारून पकडता आलं असतं, एन्काऊंटर करण्याची गरज नव्हती – नितीन सातपुते

Rohit Arya : पायावर गोळी मारून पकडता आलं असतं, एन्काऊंटर करण्याची गरज नव्हती – नितीन सातपुते

| Updated on: Oct 31, 2025 | 3:08 PM

नितीन सातपुते यांनी रोहित आर्या एन्काउंटरला खुनाचा प्रकार म्हटले आहे. पोलिस हे रोहितच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडू शकले असते, असे ते म्हणाले. या प्रकरणी डीसीपी, सिनियर पीआय सोनवणे आणि एपीआय अमोल वाघमारे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नितीन सातपुते यांनी रोहित आर्याच्या कथित एन्काउंटरबद्दल तीव्र आक्षेप नोंदवत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मते, पोलिसांनी वापरलेली पद्धत ही थेट खुनासारखी असून, रोहित आर्याला पायावर गोळी मारूनही सहज पकडता आले असते, छातीत गोळी घालण्याची गरज नव्हती. या घटनेला त्यांनी मानवाधिकार उल्लंघन ठरवले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सातपुते यांनी डीसीपी, सिनियर पीआय सोनवणे आणि एपीआय अमोल वाघमारे यांना या घटनेसाठी जबाबदार धरले आहे. एपीआय अमोल वाघमारे हे पूर्वीच्या एन्काउंटर स्पेशालिस्ट, जसे की प्रदीप शर्मा, दया नायक, आंग्रे आणि प्रफुल्ल भोसले यांच्याप्रमाणे हिरो बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

Published on: Oct 31, 2025 03:07 PM