Prakash Ambedkar | शाई फेकून कोणाचे विचार दाबले जात नाही : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Dec 06, 2021 | 5:55 PM

शाई फेकून कोणाचे विचार दाबले जात नाहीत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार गिरीष कुबेरांवरील शाईफेकीच्या घटनेचा निषेध नोंदवला.

Follow us on

दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर रविवारी शाईफेक (Ink Thrown) करण्यात आली. नाशिकमध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनस्थळी (Nashik Sahitya Sammelan) हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गिरीश कुबेर हे सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याने हा हल्ला केल्याचं संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) सांगण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडली. दरम्यान, शाई फेकून कोणाचे विचार दाबले जात नाहीत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.