BIG Breaking : नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, प्रकरण नेमकं काय?

BIG Breaking : नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Dec 24, 2025 | 4:11 PM

कुडाळ न्यायालयाने आमदार नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या ओबीसी आंदोलनात आणि संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. नितेश राणे वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात थेट वॉरंट काढले.

कुडाळ न्यायालयाने आमदार नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, संविधान बचाव आंदोलन प्रकरणीही त्यांच्यावर वॉरंट जारी झाले आहे.

या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत नितेश राणे आणि त्यांच्यासोबतचे अन्य पाच जण गैरहजर राहिले. तर आमदार निलेश राणे आणि राजन तेली यांच्यासह अन्य आरोपी उपस्थित होते. नितेश राणे न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने, न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

Published on: Dec 24, 2025 04:09 PM