Anil Deshmukh | अनिल देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघणार?

Anil Deshmukh | अनिल देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघणार?

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 6:51 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात NBW अर्थात अजामीनपात्र वॉरंट काढलं जाण्याची शक्यता आहे.  तपासाला सहकार्य करत नसल्याने वॉरंट काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात NBW अर्थात अजामीनपात्र वॉरंट काढलं जाण्याची शक्यता आहे.
 तपासाला सहकार्य करत नसल्याने वॉरंट काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याचा तपास ईडीकडून केला जातोय. या गुन्ह्यात देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आलंय. मात्र, समन्स बजावूनदेखील ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत. याच कारणामुळे ईडी अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे.