Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Jun 09, 2022 | 11:58 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढ झाल्याचं दिसतंयय.

Follow us on

सांगली :  राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. सांगलीच्या (sangali) शिराळ कोर्टानं (MNS) वॉरंट काढलंय. 11 जुलैला हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत.  2008 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वारंट निघूनही हजर न राहिल्यानं त्यांना बुधवारी अजामीन पात्र वारंट बजावण्यात आलं आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्यानं त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द करण्यात आला होता.