Imtiyaz Jaleel : जलील थेट किचनमध्ये आजचा बेत चिकन खुर्मा.. मांसविक्री बंदीचा निषेध अन् घरीच ठेवली बिर्याणी पार्टी
जलील यांनी बिर्याणी पार्टीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांनाही निमंत्रण पाठवल्याचे सांगितले आहे. हा एक प्रतिकात्मक निषेध असून, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न यातून दिसतो.
मांसविक्री बंदीच्या निर्णयाचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच इम्तियाज जलील यांच्याकडून आज त्यांच्या घरीच नॉन व्हेज मटण, चिकन बिर्याणी पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण दिल्याचेही इम्तियाज जलील यांनी स्वतः माध्यमांना सांगितले होते. अशातच छत्रपती संभाजीनगर मधील इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानातील स्वयंपाकघरात थेट जलील स्वतः पाहायला मिळत असून ते स्वतःच्या हाताने नॉनव्हेज बिर्याणी करत असल्याचे त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना सांगितले. इम्तियाज जलील यांनी महापालिकेच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाचा तीव्र आक्षेप नोंदवत हा निर्णय व्यक्तीच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आपल्या कृतीतून त्यांनी प्रशासनाच्या या आदेशाला प्रत्यक्ष आव्हान दिले आहे.
