Laxman Hake : काय देताय मानधन? सांगा.. हाकेंना पैसे देण्याची कुणाची ऑफर? ‘त्या’ व्हायरल ऑडिओनं हाके वादात

Laxman Hake : काय देताय मानधन? सांगा.. हाकेंना पैसे देण्याची कुणाची ऑफर? ‘त्या’ व्हायरल ऑडिओनं हाके वादात

| Updated on: Sep 22, 2025 | 11:03 AM

एक व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे समाजसेवक लक्ष्मण हाके चर्चेत आले आहेत. या ऑडिओमध्ये हाके यांना पैसे देण्याचा प्रस्ताव असल्याचे ऐकू येत आहे. हाके यांनी बदनामीचे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांच्यावर सुपारी घेतल्याचा आरोपही केला जात आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. एक व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये अज्ञात व्यक्ती हाके यांना पैसे देण्याची ऑफर देत असल्याचे दिसतेय.  लक्ष्मण हाके यांनी याला बदनामीचा डाव असल्याचा दावा केला आहे. ऑडिओमध्ये पैसे देण्याची चर्चा असून लक्ष्मण हाके यांना Google Pay किंवा फोनपेऐवजी प्रत्यक्ष भेटून पैसे देण्यास पसंती आहे हेही दिसून येतंय. तसेच, याच ऑडिओमध्ये लक्ष्मण हाके यांवर सुपारी घेऊन समाजविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी या आरोपांना फेटाळले आहे आणि बदनामीसाठी हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. या व्हायरल ऑडिओमुळे हाके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही त्यांचे काही व्हायरल व्हिडिओ वादग्रस्त ठरले होते.

Published on: Sep 22, 2025 11:03 AM