Laxman Hake : मनोज जरांगे साडे 28 किलोचे भूत, महाराष्ट्राच्या मानगुटीवर… हाकेंची जिव्हारी लागणारी टीका

Laxman Hake : मनोज जरांगे साडे 28 किलोचे भूत, महाराष्ट्राच्या मानगुटीवर… हाकेंची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Aug 26, 2025 | 1:32 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही, असा आरोप हाकेंनी केलाय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठ्यांना ओबीस प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टला गणेशोत्सवादरम्यान मुंबईत धडकणार आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले जाते. यावरून दोन्ही नेते आमने-सामने आलेत. दरम्यान, मनोज जरांगे साडे अठ्ठावीस किलोचं भूत असल्याचे म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच घणाघात केलाय.

तर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील याला आतापर्यंत एकदाही अटक झाली नाही. आम्हाला अटक करण्यासाठी जी तप्तरता दाखवली जाते. ती मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत का नाही? तो अनपड माणूस रोज मुख्यमंत्र्यांची आय-माय काढतोय, त्याला अटक कराना… असं म्हणत हाकेंनी संपात व्यक्त केलाय. तर जरांगे नावाच्या खुळचट माणसाला एक न्याय आणि आमच्या सारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय, कायद्यामध्ये दूजाभाव होत असल्याचा आरोप हाकेंनी केला.

Published on: Aug 26, 2025 01:24 PM