Pune Video : सीरिअलमधील जाहिरातींच्या माऱ्याने आज्जीचं डोकं भणभणलं, थेट सुळेंकडे अजब मागणी; म्हणाल्या, ताई आता तुम्हीच…

Pune Video : सीरिअलमधील जाहिरातींच्या माऱ्याने आज्जीचं डोकं भणभणलं, थेट सुळेंकडे अजब मागणी; म्हणाल्या, ताई आता तुम्हीच…

| Updated on: Oct 06, 2025 | 12:59 PM

पुण्यात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गासोबत नियोजित बैठकीसाठी आले असताना यावेळी एका आजीने सुप्रिया सुळेंकडे जी मागणी केली त्यामुळे त्या आजीची चांगलीच चर्चा होतेय.

पुण्यातून एक गंमतीशीर बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गासोबत नियोजित बैठकीसाठी आल्या होत्या. त्यावेळी एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. याभेटीत या आजीनं केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या आजींनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि म्हणल्या, माझा मुलगा आणि सून कामाला जातात. तर मी घरी असल्याने टीव्हीवर सिरियल बघत असते. एक सिरियल 30 मिनिटांची असते. पण त्यामध्ये जवळपास 20 मिनिटांच्या जाहिराती असतात. त्यामुळे आम्ही काय जाहिरातीसाठी पैसे भरतो का ताई यावर तुम्ही काही तरी करा, अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. यानंतर एकच हशा पिकला

Published on: Oct 06, 2025 12:49 PM