Vijay Singh Bangar : नशा, पैशाचा मोह अन्… त्याला बीडचा बाप व्हायचं होतं, कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा दाव्यानं खळबळ

Vijay Singh Bangar : नशा, पैशाचा मोह अन्… त्याला बीडचा बाप व्हायचं होतं, कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा दाव्यानं खळबळ

| Updated on: Jul 02, 2025 | 3:38 PM

वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी कराडवर खळबळजनक आरोप केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर याने खळबळजनक दावे केले आहेच. वाल्मिक कराडच्या मागे अदृश्य शक्ती होती. वाल्मिक कराडला बीड जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं. त्याने लोकांचं आर्थिक शोषण आणि मानसिक छळ देखील केलाय. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडने माझ्यासमोरच तीन लोकांना मारलंय, अशी धक्कादायक माहिती कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर याने टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. वाल्मिक कराडपासून दूर झाल्यानंतर वाल्मिकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र त्याला नकार दिल्यामुळे आमच्यात खटके उडायला सुरुवात झाली असं विजयसिंह (बाळा) बांगर याने सांगितलं. बघा काय-काय केले मोठे दावे?

Published on: Jul 02, 2025 03:38 PM