Operation Shield : पुन्हा मोठं काहीतरी घडणार? ‘या’ पाच राज्यात आज मॉक ड्रिलचे आदेश

Operation Shield : पुन्हा मोठं काहीतरी घडणार? ‘या’ पाच राज्यात आज मॉक ड्रिलचे आदेश

| Updated on: May 29, 2025 | 10:25 AM

भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत ६ आणि ७ मेच्या रात्री आंतरराष्ट्रीय सीमेच्या १०० किलोमीटर आतपर्यंत हवाई हल्ले केलेत यामध्ये दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. अवघ्या २५ मिनिटांत भारतीय हवाई दलानं पाकची झोपच उडवली.

देशातील भारत-पाकिस्तान सीमेवरील पाच राज्यात आज पुन्हा एकदा मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज म्हणजेच २९ मे रोजी सुरक्षा मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. गुजरात, राजस्थान जम्मू काश्मीरमधील मॉक ड्रिल पुढे ढकललं तर आज संध्याकाळी पाच वाजता हरियाणात मॉक ड्रिल होणार आहे. दरम्यान, पहलगाम हल्ला करण्यात आल्यानंतर आणि ऑपरेश सिंदूरच्या आधी देशात एकदा मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. तर ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून पहिल्यांदाच मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर येथील पहलागमध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली होती. मात्र ६ आणि ७ मेच्या रात्रीच भारतीय सैन्यानं पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करत पाकला उद्ध्वस्त केले. मात्र आता पुन्हा एकदा मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आल्यानंतर पुन्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: May 29, 2025 08:57 AM