तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल होणार? माजी मंत्र्याच्या पोराचं विमान लँड पण टेक ऑफ झालेला वाद जमिनीवर नाहीच

तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल होणार? माजी मंत्र्याच्या पोराचं विमान लँड पण टेक ऑफ झालेला वाद जमिनीवर नाहीच

| Updated on: Feb 13, 2025 | 11:59 AM

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून आपल्या मुलासाठी सारी यंत्रणा वेठीला धरली आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. कारण अंदमानपर्यंत उडालेले विमान पुन्हा पुण्याला परत आणण्यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या गेल्या.

घरून न सांगता बँकॉकला निघालेल्या पोराचं विमान माजी मंत्री तानाजी सावंत यांनी लँड केलं असलं तरी त्यावरून टेक ऑफ झालेला वाद अजून जमिनीवर आलेला नाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून विरोधकांनी सावंतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण नियमानुसार एखाद्या व्यक्तीला बेपत्ता होऊन 24 तास होत नाही तोपर्यंत बेपत्ता झाल्याची तक्रार घेतली जात नाही. मात्र या प्रकरणात सावंत यांच्या मुलानं उड्डाण केल्याच्या काही तासातच त्याचा अपहरण झाल्याचा एक निनावी कॉल पोलिसांना आला. त्या कॉलच्या आधारावर माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ मुलाचा अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्या आधारावर सगळी यंत्रणा कामाला लावून थेट बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचलेलं विमान पुन्हा पुण्यात लँड करण्यात आलं.

मुलाचा बेपत्ता झाल्यावर थेट अपहरणाचा गुन्हा कसा या चर्चेवरून सत्तेतीलच नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सावंतांचे पुत्र जर प्रवासी विमानाने गेले असते तर 22000 प्रत्येकी या हिशेबाने तिघांच्या तिकिटासाठी 66000 चा खर्च झाला असता. मात्र स्पेशल चार्टर प्लेन केल्याने त्यांनी याच प्रवासासाठी 68 लाख रुपये मोजले. माहितीनुसार हे 68 लाख फक्त एका बाजूचे होते. जर तिथून पुन्हा चार्टर प्लेनने परतले असते तर एकूण खर्च दीड कोटीपर्यंत गेला असता. घरी न सांगता सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत दोन मित्रांसह बँकॉकला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले. ड्रायव्हर तिघांना सोडून घरी परतला… यानंतर काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 13, 2025 11:59 AM