रोजंदारीवर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश, अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई
रोजंदारीवर नियुक्त करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरीवर येण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची घोषणा करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
मुंबई – गेल्या दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. आता हे आंदोलन मोडून काढण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले असून, ज्या कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ नोकरीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 24 तासांमध्ये कर्तव्यावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची घोषणा करण्यात येईल असा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.
