Vasai Beach video : अतिउत्साही पर्यटकांची मस्ती जिरली, भरतीच्या पाण्यात कार अशी काही अडकली की….बघा व्हिडीओ
वसईच्या कळंब बीचवर रविवारी सकाळी एका पर्यटक कुटुंबाची स्कॉर्पिओ गाडी भरतीच्या पाण्यात अडकली. किनाऱ्यावर रपेट मारण्याच्या प्रयत्नात गाडी वाळूत बुडाली. परंतु स्थानिकांच्या मदतीने गाडी सुरक्षित बाहेर काढण्यात आली.
वसई तालुक्यातील कळंब बीचवर एक धक्कादायक घटना घडली. रविवारी सकाळी, काही पर्यटक आपली स्कॉर्पिओ गाडी किनाऱ्यावर उतरवून रमणीय दृश्यांचा आनंद घेत होते. भरती येण्यास सुरुवात झाली तेव्हा गाडी वाळूत अडकली. भरतीच्या उंचावर येणाऱ्या लाटेच्या पाण्यामुळे गाडी बुडण्याचा धोका निर्माण झाला. स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ मदत करून गाडी वाळूतून बाहेर काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घटनास्थळी कोणताही दुर्दैवी प्रकार घडला नाही हे समाधानकारक आहे.
Published on: Sep 22, 2025 10:43 PM
