एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी – पडळकर
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपानेत गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची शिष्टमंडळासोबत भेट घेतली.
मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपानेत गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची शिष्टमंडळासोबत भेट घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, एसटी कर्मचारी हे विलनिकरणावर ठाम आहेत. त्यामुळे आता शासनाने या संपाकडे गांभीर्यांने बघावे. लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
