Pahalgam Attack : नवा व्हिडीओ, नवा प्रश्न… पहलगाममधील गोळीबाराचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर

Pahalgam Attack : नवा व्हिडीओ, नवा प्रश्न… पहलगाममधील गोळीबाराचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर

| Updated on: Apr 28, 2025 | 7:32 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अहमदाबादचे रहिवाशी ऋशी भट यांच्या मोबाईमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात गेल्या मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे एका-मागून एक व्हिडीओ आता तपासादरम्यान समोर येत आहे. अशातच पहलगाममधील गोळीबाराचा आणखी एक नवा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. गुजरात येथील अहमदाबादचे रहिवाशी ऋशी भट यांनी एक व्हिडीओ शूट केला आहे. पहलगाम येथे झिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक मागे गोळीबार सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आणि अचानक पर्यटकांमध्ये धावाधाव सुरू झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, पत्नीसमोर काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यावेळी आम्ही लपलो म्हणून बचावलो, असे अहमदाबादचे रहिवाशी ऋशी भट यांनी सांगितले. दरम्यान, परंतू झिपलाईनचा करताना शेजारी असणारी व्यक्ती अल्लाह हू अकबर…असं सातत्याने बोलत होता. तर गोळीबार सुरू असताना हा व्यक्ती अल्लाह हू अकबर… म्हणत असल्याने त्याच्यावर संशय असल्याचे ऋशी भट यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 28, 2025 07:32 PM