Pahalgam Attack Update : पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?

Pahalgam Attack Update : पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?

| Updated on: Apr 24, 2025 | 4:45 PM

पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. तिथे आज सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पहलगाममध्ये भेट देऊन हल्ला झालेल्या घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसंच घटनास्थळावर हल्ल्याचं रीक्रिएशन केल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. सीआरपीएफ सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. तिथे आज सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. यात प्रामुख्याने सीआरपीएफचे अधिकारी होते. या पाहणीत अधिकाऱ्यांनी या दहशतवादी हल्ल्याचं रीक्रिएशन केलं असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. सध्या या ठिकाणी जाण्याचा घोडेस्वारीचा राष्ट्र बंद असल्याने पायवाटेने हे अधिकारी घटनास्थळी गेले होते. त्यामुळे येथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. घटनेला आज 3 दिवस झाले आहेत. तरीही या अतिरेक्यांना पकडण्यात यश आलेलं नाही, त्यामुळे मोठं आवाहन सध्या भारतीय सैन्य दलासमोर आहे.

Published on: Apr 24, 2025 04:45 PM