Pahalgam Attack :  ‘मी माझा बाप गमावलाय…अजूनही मनात धास्ती, रायफलधारी लोकं डोळ्यासमोर…’, जगदाळे कुटुंबीयांची एकच मागणी

Pahalgam Attack : ‘मी माझा बाप गमावलाय…अजूनही मनात धास्ती, रायफलधारी लोकं डोळ्यासमोर…’, जगदाळे कुटुंबीयांची एकच मागणी

| Updated on: Apr 30, 2025 | 4:27 PM

हल्ल्यासंदर्भात ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जाताय त्या ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत आम्ही नाही. राजकीय विषय या गोष्टीत आणू नका... आम्ही तुमच्या समोर बोलतोय म्हणजे आम्ही नीट आहोत असं नाही... मी माझा बाप गमावलाय... असं म्हणत असावरी जगदाळे यांनी भावना व्यक्त केल्यात.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी आपला जीव गमावला. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचा देखील दुदैवी मृत्यू झाला. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेलाय. यानंतर देखील हल्ल्यात प्राण गमावलेल्या कुटुंबीयांचा त्या घटनेनं जीव धास्तावलेलाच आहे. ‘आमच्या आयुष्यात काहीच बदल झालेला नाही. आम्ही अजूनही बेताब व्हॅली तिथंच आहोत जिथं हा भयानक हल्ला झाला होता. दिवस रात्र आमच्या डोळ्यांसमोर तेच चित्र रायफलधारी लोकं दिसत आहेत.’, संतोष जगदाळे यांची कन्या असावरीने म्हटलंय.

हल्ल्याची घटना आम्ही कधीच विसरू शकणार नाही. पण एकच विनंती आहे की, या घटनेवर असंवेदनशील वक्तव्य करताय. आम्ही जे भोगलंय ते आम्हाला माहितीये. कोणीही आमच्या भावनांशी खेळू नका, असं स्पष्टच आसावरी जगदाळे यांनी म्हटलंय. अशातच संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाकडून सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे. सरकारने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी आसावरी जगदाळे हिच्याकडून केली जात आहे.

Published on: Apr 30, 2025 04:26 PM