Indus Waters Treaty : ‘आम्ही पण…’, सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या पंतप्रधानांचा भारताला थेट धमकी

Indus Waters Treaty : ‘आम्ही पण…’, सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या पंतप्रधानांचा भारताला थेट धमकी

| Updated on: Apr 26, 2025 | 12:56 PM

आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे नेहमी उभे राहणार आहे. हा संदेश स्पष्ट असल्याचे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकीवजा इशारा दिलाय.

जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला थेट उत्तर देण्यात आलं. झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून भारताने सिंधु पाणी करार स्थगित केला. यानंतर पाकिस्तान देखील भारताला सातत्याने धमक्या देताना दिसतंय. दरम्यान, सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक वक्तव्य करत भारताला थेट धमकीवजा इशारा दिलाय. भारताने सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताच्या हल्ल्याचं आम्ही पण उत्तर देणार असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणालेत. तर सिंधु आमची लाईफ लाईन, सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलंय. यासह पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे. शांतता आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नसल्याचे म्हणत त्यांनी हा इशारा दिलाय.

Published on: Apr 26, 2025 12:55 PM